अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून इराण पेटलं : हिंसाचारात 7 ठार

June 16, 2009 5:26 PM0 commentsViews: 3

16 जून अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून इराण पेटलं असून हिंसाचारात 7 जण ठार झाले आहेत. अध्यक्षपदाच्या वादग्रस्त निवडणुकीच्या मतदानाची फेर मतमोजणी होणार आहे. इराणच्या गार्डियन काऊन्सिलने फेर मतदानाची तयारी दाखवली आहे.इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मेहमूद अहमदीनेजाद पुन्हा विक्रमी मतांनी निवडून आले होते. पण निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत मेहमूद यांचे मुख्य प्रतिस्पर्धी मौसवी यांनी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला इस्रायल आणि अमेरिकेचाही पाठिंबा मिळाला. आंदोलनात मौसवी यांचे सात समर्थक ठार झाले आहेत. सुधारणावादी नेते मौसवी यांनी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच तेहरानच्या फ्रीडम स्क्वेअरमध्ये जाहीर सभा घेतली. त्याला हजारो नागरिकांनी सरकारची बंदी धुडकावत हजेरी लावली.

close