गांधींजींवर केलेल्या टीकेमुळे भाजने फटकारलं मायावतींना

June 16, 2009 5:29 PM0 commentsViews: 3

16 जून महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेबद्दल भाजपने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना फटकारलं आहे. बसपाने प्रकाशित केलेल्या एका पुस्तिकेत महात्मा गांधी यांना नौटंकीबाज असं म्हणण्यात आलं आहे. त्यावर मायावती यांनी गांधीजींचं जीवन आणि कार्य यांचा व्यवस्थित अभ्यास करावा, असा सल्ला भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांनी दिला. तर गांधीजींच्या आदर्शांचा अवलंब करणं कठीण असलं तरी, त्यांच्या प्रामाणिकपणावर टीकारांनीही शंका उपस्थित केली नाही, असं मुरली मनोहर जोशी म्हणाले.

close