मराठीचा तिरस्कार करणार्‍या गुजरातींना हाकलून द्यायचंय -राणे

November 6, 2014 8:49 PM0 commentsViews:

nitesh rane kankavali06 नोव्हेंबर : मलाही स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हायचंय आणि मराठीचा तिरस्कार करणार्‍या गुजरातींना मुंबईतून हाकलून द्यायचंय असं वादग्रस्त विधान काँग्रेसचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी केलंय. नितेश यांनी याबाबत ट्विट करुन पुन्हा एकदा गुजराती समाजाला टार्गेट केलंय.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्ष सावरायचा प्रयत्न करतोय. अशा वेळेस काँग्रेसच्या तरुण नेत्यांकडूनही पक्षाला बर्‍याच अपेक्षा आहेत. मात्र, हे नेते या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी नको ते बोलून पक्षालाच अडचणीत आणण्याचं काम करत आहेत. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यानंतर आता कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईतल्या गुजराती समुदायाला पुन्हा टार्गेट केलंय. नितेश यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदवल्यामुळे वाद निर्माण झालाय. नितेश म्हणतात, “मलाही स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हायचंय आणि मराठीचा तिरस्कार करणार्‍या गुजरातींना मुंबईतून हाकलून द्यायचंय. माझ्या गुजरातीविरोधी वक्तव्यावर कायम आक्षेप घेतला जातो मात्र प्रत्यक्षात ते मराठी माणसांविरुद्ध किती आक्षेपार्ह वक्तव्यं करतात, याकडे कोणालाच पाहायचं नाहीये”. त्यांच्या ट्विटनंतर नितेश यांनी माध्यमांशी बोलतांना आपल्याविधानावर ठाम असल्याचं सांगितलं. आज काही गुजराती लोकं आमच्या विरोधात वादग्रस्त विधान करत आहे. मराठी माणसांनं गुजरात्यांचं गुलाम राहावं, त्यांच्या घरी मराठी माणसांनं काम करावं जर असं कुणी बोलत असेल तर आम्ही का गप्प बसायचंय ? हे असं चालणार नाही त्यामुळे मी माझी भूमिका मांडली असं नितेश राणेंनी सांगितलं. तसंच माझा गुजराती समाजाला विरोधा नाही पण काही गुजराती असं बोलत असतील तर त्याविरोधात बोलणाराच असा पवित्राही राणे यांनी घेतला.

नितेश राणे यांचा ट्विट -

मलाही स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हायचंय आणि मराठीचा तिरस्कार करणार्‍या गुजरातींना मुंबईतून हाकलून द्यायचंय. माझ्या गुजरातीविरोधी वक्तव्यावर कायम आक्षेप घेतला जातो मात्र प्रत्यक्षात ते मराठी माणसांविरुद्ध किती आक्षेपार्ह वक्तव्यं करतात, याकडे कोणालाच पाहायचं नाहीए.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close