लालगढमध्ये सीपीएम सापडली वादाच्या भोव-यात

June 16, 2009 5:33 PM0 commentsViews: 5

16 जून माओवाद्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सीपीएमच्या कार्यकर्त्यांशी पुन्हा चकमक झाली. निदर्शकांनी लालगढमध्ये सीपीएमच्या ऑफीसला आग लावली. शनिवारपासून सुरू असलेल्या चकमकीत 4 जण ठार झाले. ऍट्रॉसिटीचं उल्लंघन केलेल्या पोलिसांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी लालगढमध्ये आदिवासींनी निदर्शनं सुरू केलीत. या भागातून एक पोलीस आऊटपोस्ट आणि दोन कॅम्प काढून घेण्यात आलेत. विशेष म्हणजे हा भाग सीपीएमचा बालेकिल्ला समजला जातो. पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम आणि सिंगूरनंतर आता लालगढमध्ये सीपीएमला संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे.

close