भाजपची नरमाई, सेनेला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर

November 6, 2014 11:25 PM1 commentViews:

uddhav_sena_ledar3206 नोव्हेंबर : शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही यावरुन सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्ह आहे. भाजपने शिवसेनेच्या मागण्यांपुढे नरमाईची भूमिका घेतली असून आठवड्याच्या शेवटी होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी फोन केल्याचंही सूत्रांनी सांगितलंय.

आधी विश्वासदर्शक ठराव आणि मग मंत्रिमंडळाचा विस्तार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवली. याबाबतच आज शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत निर्णयाचे अधिकार उद्धव ठाकरेंना देण्यात आलेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सेनेला आणखी एक पद मिळावं अशी मागणी शिवसेनेनं केली. तर महाराष्ट्रात आधी शपथ आणि मग विश्वासदर्शक ठराव अशी भूमिका शिवसेनेनं कायम ठेवलीये. विश्वासदर्शक ठरावापूर्वी सेनेच्या काही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ द्यावी या मागणीवरुन शिवसेना मागे हटायला तयार नाहीये. सेनेच्या भूमिकेनंतर थेट दिल्लीतून सूत्रं फिरली. भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोन करून केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एक मंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली. तसंच दिल्लीतल्या भाजप नेतृत्वाची सेनेसोबत चर्चा सुरू आहे आणि सर्व काही ठीक होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आता केंद्रात संबंध सुधारल्यानंतर आता राज्यात सेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vikrant Chavhan

    कशाला आता भाजपा नरमाई ची भूमिका घेत आहे ? गरज कुणाला आहे ? शिवसेने तर अगोदरच सांगितले आहे आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही विरोधात बसू, मग भाजपा ला गरज नाही तर का पाठीमागे लागली आहे, मला वाटते उद्धव साहेब अतिशय चतुर पणे किल्ला लढवत आहेत ..भाजपा वाले हवेत आहेत ..गरज त्यांना आहे त्यामुळे जास्त मंत्रिपद भेटली तरच पाठींबा द्यावा, कारण राजकारणात कोणीही सागरगोठ्या खेळायला येत नाही. .नाहीतर ज्यांना मागील १५ वर्ष शिव्याशाप देत होते त्यांच्याबरोबर जाऊ द्या. आलेल्या संधीचा फायदा घेणे हे ज्याला जमले तेच खरे राजकारणी.

close