‘गोवा टू दिल्ली’, पर्रिकरांची केंद्रात जागा निश्चित

November 7, 2014 1:23 PM0 commentsViews:

manohar parrikar07 नोव्हेंबर : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार हे आता निश्चित झालंय. उद्या (शनिवारी) सकाळी ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. केंद्रात कुठलं खातं द्यायचं, हे पंतप्रधान मोदी ठरवतील. पक्ष सांगेल ते काम मी करीन, असं पर्रिकर यांनी आज पत्रकारांना सांगितलं.

पर्रिकर यांच्या संरक्षणमंत्री वर्णी लागल्यानंतर गोव्यात नवा नेतानिवडीसाठी उद्या आमदारांची बैठक होणार आहे. आजही गोव्याच्या आमदारांची एक बैठक होतेय. आजची बैठक ही नियमित आहे. नव्या नेतानिवडीबद्दल ती नाही, असं स्पष्टीकरण पर्रिकरांनी दिलंय. सध्या अरुण जेटलींकडे अर्थ आणि संरक्षण ही दोन महत्त्वाची खाती आहेत. यापैकी संरक्षण खातं पर्रिकरांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. मला केंद्रात जायची इच्छा नाही, असं पर्रिकर याआधी अनेक वेळा म्हणाले आहेत. पण त्यांना केंद्रात आणण्यावर भाजपचे बडे नेते ठाम असल्याचं दिसतंय. मे महिन्यात जेव्हा केंद्र सरकारमध्ये खातेवाटप झालं होतं, तेव्हा दोन अत्यंत महत्त्वाची खाती एकाच व्यक्तीला देण्यावरून टीकाही झाली होती. दरम्यान, भाजपचे निरीक्षक राजीव प्रताप रुडी आणि बी.एस.येड्‌ड्युरप्पा गोव्याला जाणार आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close