मुंबईत डेंग्यूमुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

November 7, 2014 12:18 PM1 commentViews:

dengu deth07 नोव्हेंबर : एकीकडे मुंबईकरांना डेंग्यूची धास्ती भरलीये तर प्रशासनाने डेंग्यूचा सफाया करण्यासाठी पावलं उचलली आहेत. परंतु याला डॉक्टरच अपवाद ठरल्याचं समोर आलंय. मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये एका 20 वर्षीय शुभम तिवारी या तरुणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाला असा तिवारी कुटुंबीयांनी केलाय.

शनिवारी डेंग्युच्या तापानं फणफणार्‍या शुभम तिवारी नावाच्या तरुणाला केईएम हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना दाखल केलं. पण रुग्णालयातल्या डॉक्टरांनी तब्बल चार तास त्याला खुर्चीतच बसवून ठेवलं. इतकचं नाही तर रक्त तपासणीसाठी न घेता सलाईनवर ठेवलं. तब्बल आठ तासानंतर डॉक्टरांनी शुभमला डेंग्यू झाला असल्याचं पालकांना सांगितलं. पालकांनी तब्बेतीची जास्त विचारणा केली तेव्हा तुमच्या सारखे शेकडो तरुण आमच्या रुग्णालयात पडले आहे अशा शब्दात पालकांना फटकारण्यात आलं. वेळेवर उपचार न झाल्यामुळे रविवारी सकाळी शुभमला मृत घोषित करण्यात आलं होतं. शुभम तिवारीच्या नातेवाईकांनी केईम हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर आरोप केलाय. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला म्हणून शुभमचा मृत्यू झाला असा आरोप शुभमच्या वडिलांनी केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Nikhil

    I know the person personally…He was the man whose hands were just called as “Helping Hands” and the news was so sad that the Helping Hands person did not got any single hands from the Hospital staff. If he would have got one single hand i am sure that he must have been ALIVE………….. till now with us and helping few more peoples which goverment havent done.

close