राज यांचा जामीन केला हायकोर्टाने रद्द

June 16, 2009 5:36 PM0 commentsViews: 3

16 जून कल्याण मारहाण प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जामीन हायकोर्टानं रद्द केला आहे. त्यांना 29 जून रोजी कोर्टात हजर राहण्यांचे आदेश दिलेत. गेल्यावर्षी कल्याण इथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे परीक्षा उधळल्या होत्या. तसंच उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. त्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राज ठाकरेंना अटकही झाली होती. पण कल्याण कोर्टानं त्यांना जामीन दिला होता. मंगळवारी हायकोर्टाने दिलेला जामीन रद्द करत 29 जूनला राज ठाकरे यांना हायकोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

close