सत्तेत सहभागाचा निर्णय 9 तारखेला -राऊत

November 7, 2014 4:39 PM0 commentsViews:

07 नोव्हेंबर : सत्तेत शिवसेना सहभागी होणार की नाही, याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. 9 तारखेला आमदारांची बैठक घेऊन नंतर निर्णय जाहीर केला जाईल, असंही त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असणार आहे त्यामुळे पंतप्रधान काय निर्णय घेता हा त्यांचा अधिकार आहे. त्यानंतर आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतील असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपने सेनेला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर दिलीये. सेनेनंही राज्यात 10 मंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केलीय. त्यामुळे केंद्राने ही ऑफर दिलीये. त्याचपार्श्वभूमीवर आता शिवसेनेची नऊ तारखेला बैठक होणार आहे या बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close