H1N1 व्हायरसचे पंजाबमध्ये दोन तर सिमल्यात साडला एक रुग्ण

June 16, 2009 5:42 PM0 commentsViews: 2

16 जून H1N1 व्हायरसचे पंजाबमध्ये आणखी 2 आणि सिमलामध्ये 1 रुग्ण आढळलाय. त्यामुळे देशभरातल्या रुग्णांचा आकडा आता 34 झाला आहे. हे पाहता H1N1 व्हायरसचा भारतात झपाट्याने प्रसार होत असल्याचं आढळून आलं आहे. हैदराबादमध्ये H1N1 चा 13 वा रुग्ण आढळून आला आहे. न्यूयॉर्कहून रविवारी आलेल्या 13 वर्षाच्या मुलाला H1N1 ची बाधा झाली आहे. अमेरिकेतल्या नासातून जालंधरला आलेल्या 7 विद्यार्थ्यांना H1N1 ची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. सोमवारी बँकाकहून मुंबईत आलेल्या 12 वर्षाच्या मुलीला H1N1 ची बाधा झाल्याचा संशय आहे. तिच्या रक्ताचे नमुने तपासणासाठी पुण्याला पाठवण्यात आलेत.

close