विमानाला धडकली म्हैस

November 7, 2014 6:34 PM0 commentsViews:

surat_mahis07 नोव्हेंबर : गुजरातमधील सुरतच्या विमानतळावर गुरुवारी संध्याकाळी विमानाने उड्डाणासाठी रनवेवर धाव घेतल्यानंतर एक म्हैस येऊन धडकल्यामुळे खळबळ उडाली. पायलटने प्रसंगावधान राखून तातडीने विमानाचे लँडिंग रोखले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

विमानतळाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सात वाजता सुरत विमानतळावर स्पाईस जेटचे एससी 622 विमान उड्डाणासाठी रनवेवर धाव घेतली. पण अचानक एक तीन म्हैशी रनवेवर आल्यात त्यातील एक म्हैस विमानाला येऊन धडकली. त्यातच जागीच तिचा मृत्यूही झाला. तसंच विमानाचंही थोडं नुकसान झालं, मात्र वेळेवर पायलटने वेळीच टेकऑफ थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुत्रांच्या माहितीनूसार, या दुर्घटनेनंतर स्पाईस जेटने काही काळ आपल्या विमानांच्या उड्डाणावर बंदी आणली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close