मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव :शिवसेना

November 7, 2014 10:10 PM2 commentsViews:

shwale on cm07 नोव्हेंबर : मुंबईसाठी सीईओ नेमण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरून वाद निर्माण झालाय. मुंबईला सीईओ नेमणे हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केलाय. मुंबईसाठी सीईओ नेमण्यापेक्षा मुंबई महापालिका बळकट करा, अशी मागणी शिवसेनेनं केलीये.

सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये तळ्यातमळ्यात सुरू असताना आता आणखी एका वादामुळे आमने-सामने आली आहे. मुंबईला नवा सीईओ (विशेष कार्यकारी अधिकारी) मिळण्याची शक्यता आहे. अतिरिक्त मुख्य सचिवांच्या दर्जाचा हा अधिकारी असेल. तसंच मुख्य सचिवांच्या खालोखाल या अधिकार्‍याला अधिकार असतील. मुंबईतल्या विकासासंदर्भात सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा समन्वय राखण्यासाठी या अधिकार्‍याची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी दिली. या सीईओची नेमणूक करण्याला प्राधान्य राहील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र मुंबईत सीईओ नेमण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला शिवसेनेनं कडाडून विरोध केलाय.

मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे. मुंबईला सीईओ नेमणे हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. या अगोदरही काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला होता. पण तेव्हाही आम्ही विरोध केला होता. त्यावेळी भाजप आमच्यासोबत होती. आज सत्तेत आल्यावर फडणवीस यांनी हा निर्णय घेतलाय तो अत्यंत दुर्देवी आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री हे युडीचे प्रमुख आहे. आणि युडीच्या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेसह,एमएमआरडीए, धारावी प्राधिकरण, म्हाडा, मिठी नदी प्राधिकरण येते आणि त्याचे प्रमुख आता मुख्यमंत्री आहे. या सर्व ठिकाणी आयुक्त, सीईओंची नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. जर मुख्यमंत्र्यांना त्यांच्यावर विश्वास नसेल तर आयुक्तांची बदली करावी, त्यांच्या जागी नवीन आयुक्त नेमावे पण अशा वेळी नवीन सीईओ निर्माण करून मुख्यमंत्री अडचणी निर्माण करत आहे असा आरोपही शेवाळे यांनी केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Adv Nachiket

  मुंबई तशीही मराठी माणसाची राहिलीच कुठे? मुंबईत घर विकत घेणं हे मराठी माणसासाठी जणू दिवास्वप्नच झालयं. मुंबईत निवडणूकीत हरलेल्या राजकीय पक्षांनी त्यांच्या अपयशाचा विचार करायला हवा.
  मुंबईच्या मराठी माणसांची मनं जोडावीत मग मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकणार नाही.

 • Rajaram Khanolkar

  कहते है मोदी जी ने अब तक कुछ नही किया देख लो क्या क्या किया है अब तक मोदी ने

  मोदी ने धारा 370 हटा दी

  गौहत्या पर प्रतिबन्ध लगा दिया

  भ्रस्टाचार खत्म कर दिया

  400लाख करोड़ कालाधन देश में वापस ले आये

  लाहौर पर कब्ज़ा कर लिया भारत ने

  चीन अब भारत का हिस्सा है

  किसी भी सरकारी दफ्तर में बिना रिश्वत के काम हो जाता है

  पुलिस अब नेता की या पैसे वाले की नही आम जनता की सुनती है

  किसी भी मुकदमे का एक साल में फैसला हो जाता है कोर्ट में

  सोनिया गाँधी को 40 साल जेल की सजा और सारी संपत्ति जब्त कर ली गयी है

  रोबर्ट वढरा भी जेल की सलाखों के पीछे है लालू मायावती के साथ

  महिला सुरक्षा विधेयक पारित हुआ है. अब देश मे बलात्कार बिल्कुल नही होते और देर रात भी इत्मिनान से आवागमन कर सकती है.

  भाजपाके तीन करोड़ मेंबर्ज़ बढ कर पांच करोड़ मेंबर्ज़ने पूरा देश स्वच्छ किया है.

  ऊपर लिखी सभी बातें बीजेपी #अंधभक्तों के लिए सत्य घटना है कृपया उनकी भावनाओं को समझे और उनकी मानसिक स्तिथि को समझे और उनका मजाक न बनाये!

  धन्यवाद

close