रिलायन्स आणि बेस्ट करणार घरगुती वीजबिलांची दरवाढ

June 16, 2009 5:45 PM0 commentsViews: 5

16 जून रिलायन्स आणि बेस्टच्या वीजबिलांच्या दरात वाढ होणार आहे. रिलायन्सच्या घरगुती वीज-बिलांच्या दरात 7 टक्क्यांनी वाढ होणार तर बेस्टच्या घरगुती वीज-बिलांच्या दरात 9टक्क्यांनी वाढ होणार आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रीकल रेग्युलेटरी ऑथरीटीकडून वीजबिल दरवाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट असताना आता रिलायन्स आणि बेस्टने ग्राहकांना धक्का दिला असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांमधून येत आहे. पण असं असताना रिलायन्स आणि बेस्टकडून व्यापारी आणि औद्योगिक संस्थांना होणार्‍या वीज-बिलांच्या दरात कपात करण्याचे आदेश महाराष्ट्र इलेक्ट्रीकल रेग्युलेटरी ऑथरीटीने दिले आहेत.

close