पर्रिकर मुख्यमंत्रिपदातून मुक्त, पार्सेकर होणार मुख्यमंत्री

November 8, 2014 12:49 PM1 commentViews:

parrikar_parsikar08 नोव्हेंबर :अखेर आज मनोहर पर्रिकर गोव्याच्या भूमीला निरोप देणार आहे. पर्रिकर यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी होणार आहे. त्यासाठी पर्रिकरांनी मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहे. त्यांच्या जागी गोव्याचे आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झालंय. त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा आता बाकी आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज दुपारी चार वाजता होणार आहे.

कोण आहेत लक्ष्मीकांत पार्सेकर
– विद्यमान आरोग्यमंत्री
– मांद्रे मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार
– हरमल पंचक्रोशी उच्च महाविद्यालयाचे प्राचार्य होते
– गोव्यात भाजप रोवण्यात महत्त्वाचा सहभाग
– संघाचे स्वयंसेवक
– पर्रिकर सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून काम
– 2002 मध्ये गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्रिपदासाठी गटबाजीनाट्य

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदीनी त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्याचं निश्चित केल्यामुळे पर्रिकराना गोवा सोडावा लागतोय. पण आता मुख्यमंत्रिपदावरून गोवा भाजपमध्ये गटबाजी आणि नाराजीनाट्य घडले. गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रांसीस डिसुझा यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केलाय. पण आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आङे. अखेर दुपारी 12 वाजता झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. विशेष म्हणजे, भाजपच्या संसदीय बोर्डाची नवी दिल्लीत बैठक झाली. गोव्याचे नवे मुख्यमंत्री कोण असतील, यावरही या बैठकीत चर्चा झाली. भाजप अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, अरुण जेटली, जे.पी.नड्डा आणि राम लाल हे या बैठकीला हजर होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Rajaram Khanolkar

    कहते है मोदी जी ने अब तक कुछ नही किया देख लो क्या क्या किया है अब तक मोदी ने

    मोदी ने धारा 370 हटा दी.

    गौहत्या पर प्रतिबन्ध लगा दिया.

    भ्रस्टाचार खत्म कर दिया

    400लाख करोड़ कालाधन देश में वापस ले आये

    लाहौर पर कब्ज़ा कर लिया भारत ने

    चीन अब भारत का हिस्सा है

    किसी भी सरकारी दफ्तर में बिना रिश्वत के काम हो जाता है

    पुलिस अब नेता की या पैसे वाले की नही आम जनता की सुनती है

    किसी भी मुकदमे का एक साल में फैसला हो जाता है कोर्ट में

    सोनिया गाँधी को 40 साल जेल की सजा और सारी संपत्ति जब्त कर ली गयी है

    रोबर्ट वढरा भी जेल की सलाखों के पीछे है लालू मायावती के साथ

    महिला सुरक्षा विधेयक पारित हुआ है. अब देश मे बलात्कार बिल्कुल नही होते और देर रात भी इत्मिनान से आवागमन कर सकती है.

    भाजपाके तीन करोड़ मेंबर्ज़ बढ कर पांच करोड़ मेंबर्ज़ने पूरा देश स्वच्छ किया है.

    ऊपर लिखी सभी बातें बीजेपी #अंधभक्तों के लिए सत्य घटना है कृपया उनकी भावनाओं को समझे और उनकी मानसिक स्तिथि को समझे और उनका मजाक न बनाये!

    धन्यवाद

close