पंतप्रधानांनी हाती घेतलं कुदळ-फावडं, गंगा घाटेवर केली सफाई

November 8, 2014 1:51 PM0 commentsViews:

pm modi in varansi08 नोव्हेंबर : आपण घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी कशी करायची हे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलंय. मोदींनी वाराणसीच्या प्रसिद्ध अस्सी घाटावर स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाले. मोदी नुसते सहभागी झाले नाहीतर हातात कुदळ आणि फावडं घेऊन साफ सफाई केली. पंतप्रधानांनी जवळपास 5 ते 10 मिनिट माती आणि कचरा साफ केला. महिन्याभरात गंगा घाटाची सफाई पूर्ण होईल असं आश्वासनही मोदींनी दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी दौर्‍याची आज सांगता झाली. मोदींनी आज (शनिवारी) सकाळी 8.30 वाजता गंगापूजन केलं. या पुजेसाठी 5 पुजार्‍यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी देशाच्या सुख,समृद्धी आणि विकासासाठी प्रार्थना केली. त्यानंतर ते वाराणसीतल्या प्रसिद्ध अस्सी घाटावर स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाले. त्यांच्यासह 500 मजूरही यात सहभागी झाले. विशेष म्हणजे पंतप्रधानांचा असा कोणताही कार्यक्रम ठरलेला नव्हता. मोदी अस्सी घाटावर पोहचल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना काहीव् ोळासाठी थांबवण्यात आलं. पंतप्रधानांनी खुद्ध हातात कुदळ-फावडं घेऊन साफसफाई केली. खुद्द पंतप्रधानांना हातात कुदळ आणि फावडं घेऊन सफाई करताना पाहुन वाराणसीकर अवाक् झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नऊ प्रतिष्ठित नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, क्रिकेटर मोहम्मद कैफ आणि सुरेश रैना, गायक कैलाश खेर, हास्यकलाकार राजू श्रीवास्तव यांचा समावेश आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close