64 घरांचा राजा कोण ?,विश्वनाथन-कार्लसन आमनेसामने

November 8, 2014 12:09 PM0 commentsViews:

viswanathan anand vs magnus carlsen 201408 नोव्हेंबर : 64 घरांचा राजा कोण ? हे ठरवण्यासाठी वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप फायनलला आजपासून सुरुवात होतेय. रशियातल्या सोचीमध्ये 8 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान 12 फेर्‍यांच्या या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी वर्ल्ड नंबर वन आणि जगज्जेता मॅग्नस कार्लसनला आव्हान द्यायला भारताचा 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद सज्ज झालाय.

गेल्यावर्षी मॅग्नस कार्लसनने चेन्नईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यावेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंदचाच पराभव करत वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावली होती. तर कंटेण्डर्स चॅम्पियनशिपमध्ये जगातील सर्वोत्तम 8 खेळाडूंचा धुव्वा उडवत वर्ल्ड टायटलसाठी आनंद कार्लसनचा प्रतिस्पर्धी ठरलाय. 2013 ला वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत कार्लसननं पहिलं वर्ल्ड टायटल पटकावलं होतं. तर याअगोदर तब्बल पाच वेळा जेतेपद पटकावत विश्वनाथन आनंद वर्ल्ड चॅम्पियन ठरलाय. आता मॅग्नस कार्लसनचा पराभव करत आनंद आपलं सहावं जेतेपद पटकावतो, की आनंदला पराभवाचा धक्का देत कार्लसन सलग दुसर्‍यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close