लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री

November 8, 2014 3:36 PM0 commentsViews:

parasekar08 नोव्हेंबर :अखेर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी लक्ष्मीकांत पार्सेकर यांची निवड झाली. त्यानंतर काही तासांनंतर गोव्याच्या राज भवनात लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

पार्सेकर यांच्यासह मंत्रिमंडळानंही शपथ घेतली. फ्रान्सिस डिसूझा, महादेव नाईक, रमेश तवडकर, सुदीन ढवळीकर, दयानंद मांद्रेकर यांनीही शपथ घेतली. गोव्यातल्या पर्रिकर सरकारनं केलेल्या चांगल्या योजना कायम ठेवणार असल्याचं पार्सेकर यांनी स्पष्ट केलं. पार्सेकर गोव्याचे विद्यमान आरोग्यमंत्री आहे.

मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरुन अगोदर चांगलंच नाट्य घडलं. गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसुझा यांनी सीएमपदावर दावा ठोकला होता. पण नंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याशी बातचीत केली, आणि डिसुझांची नाराजी दूर झाली. मनोहर पर्रिकर यांची केंद्रात वर्णी लागल्यामुळे त्यांनी सकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता पर्रिकर दिल्लीतल्या नव्या जबाबदारीसाठी सज्ज झाले आहेत. पण त्यांनी दिल्लीतून गोव्यावर लक्ष ठेवणार असल्याचं सांगितलंय.

 

: कोण आहेत लक्ष्मीकांत पार्सेकर ?

- गोव्याचे विद्यमान आरोग्यमंत्री
– मांद्रे मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार
– गोव्यात भाजप वाढवण्यात महत्त्वाचा सहभाग
– 2002 मध्ये गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष
– संघाचे स्वयंसेवक
– हरमल पंचक्रोशी उच्च महाविद्यालयाचे प्राचार्य होते
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close