90:10 कोटा प्रस्तावावरील निर्णय लांबणीवर

June 16, 2009 5:49 PM0 commentsViews: 3

16 जून शिक्षणमंत्र्यांनी 90 टक्के कोटा प्रस्तावावरचा निर्णय पुढे ढकलला आहे. अकरावी प्रवेशासाठी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 90 टक्के कोटा देण्याच्या प्रस्तावावर अजूनही शालेय शिक्षणमंत्र्यांनी कुठलीही घोषणा केलेली नाही. राज्याचे ऍडव्होकेट जनरल रवी कदम यांचा अहवाल शिक्षणमंत्र्यांना मिळाला आहे. त्यानंतर आता विधी व न्याय विभागाच्या सचिवांशी चर्चा करणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. दरम्यान कोटा रद्द केल्यास आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा दिला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं सोमवारी रात्री शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. एसएससीला दिलेला कोटा रद्द केला तर मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसंच भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेनचे नरेंद्र पाठक यांनीही सोमवारी पत्रकार परिषद घेऊन अकरावी प्रवेशपक्रियेबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

close