माओवाद्यांनी ट्रक पेटवले

November 8, 2014 5:19 PM0 commentsViews:

08 नोव्हेंबर : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी आज दंडकारण्य बंदचं आवाहन केलंय. या बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीसह,छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर रेड अलर्ट देण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. छत्तीसगडमधल्या
दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांनी शुक्रवारी रात्री तीन ट्रक पेटवून दिले आहेत. माओवाद्यांसाठीच्या आत्मसमर्पण योजनेसह केंद्र सरकारच्या माओवादी विरोधी धोरणाच्या निषेध करण्यासाठी दंडकारण्य बंदच आवाहन करण्यात आलंय. बंदची तीव्रता वाढविण्यासाठी माओवाद्यानी ठिकठिकाणी रस्ते खोदुन पत्रके फेकली आहेत. गडचिरोली पोलीस छत्तीसगढ आणि तेलंगाणाच्या पोलीसाच्या संपर्कात आहेत. या राज्यांच्या सीमेवर कोंबिग ऑपरेशन सुरू करण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close