जयंत पाटील यांनी केली तारासिंग यांच्या निलंबनाची मागणी

June 16, 2009 6:00 PM0 commentsViews: 31

16 जून राम प्रधान समितीच्या अहवालाची मूळ प्रत विधानसभेत सादर व्हावी, यासाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुलुंडचे भाजपचे आमदार सरदार तारासिंग हे चक्क मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीत जाऊन बसले. त्यामुळे गृहमंत्री जयंत पाटील यांनी तारासिंग यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसणं हा त्या पदाचा अपमान आहे असंही जयंत पाटील म्हणाले. ' सरकार या अहवालावर सविस्तर चर्चा न करता, थोडक्यात गुंडाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मुख्यमंत्री कोणत्याही प्रकारचा निर्णय देत नसल्यामुळे मी त्या खूर्चीत जाऊन बसलो, असं मत सांगत तारासिंग यांनी व्यक्त करत झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

close