डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे उर्वशीसह सिद्धीविनायकाच्या दर्शनाला

November 8, 2014 5:53 PM0 commentsViews:

08 नोव्हेंबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे हिला रविवारी हिंदुजा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. डिस्चार्ज मिळाल्यानंतर उर्वशीनं राज ठाकरेंसोबत प्रभादेवी इथल्या सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. स्कुटीवरून पडल्यामुळे उर्वशी ठाकरेच्या पायाला दुखापत झाली होती. तिच्यावर 5 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर तिला डिस्चार्ज मिळाला. आता तिची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. उर्वशीच्या अपघातामुळे राज यांनी आपला राज्याचा दौरा रद्द केला होता. उद्धव ठाकरेंनीही उर्वशीची हॉस्पिटलध्ये जाऊन भेट घेऊन विचारपूस केली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close