अखेर समझोता, सेनेला 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रिपदं?

November 8, 2014 7:22 PM1 commentViews:

uddhav_sena_ledar3208 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेत अखेर समझोत्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना राज्यातल्या भाजप सरकारमध्ये सहभागी होऊ शकतं. शिवसेनेला राज्यात 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीय.

राज्यात हा तोडगा निघाल्यास उद्या रविवारी होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातही सेनेला आणखी दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. अनिल देसाईंचं नाव शिवसेनेनं निश्चित केलंय. त्यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या कोट्यातून सुरेश प्रभूंना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं. शिवसेनेचे केंद्रातले मंत्री अनंत गीते सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी गेले आहेत. अनिल देसाईंचं नाव ते पंतप्रधानांना सुचवतील. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेच्या सत्ता सहभागाबद्दल विचारलं असता सगळं नीट होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

सेनेत नाराजीनाट्य

भाजप आणि शिवसेनेत जुळत असल्याची चिन्हं असतानाच शिवसेनेत मात्र नाराजीनाट्य सुरू झालंय. अनिल देसाई यांचं नाव केंद्रात मंत्रिपदासाठी सुचवल्यानं सेनेचे अनेक खासदार नाराज आहेत. दुसरीकडे सुरेश प्रभू यांच्या रुपात अनंत गीते यांच्यानंतर कोकणाला केंद्रात दुसरं मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले खासदार नाराज झालेत. त्यामुळे शिवसेना नेतृत्वापुढच्या अडचणी वाढल्यात आहेत. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्रिपदासाठी दावा केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • दत्ता जाधव

    ही सारी लोक .. पदासाठी झगड्ताना दिसतायत ,याना क्याबिनेट ,राज्यमंत्री पद का हवे आहे ? देशाचा ,महाराष्ट्राचा ,सामान्य ,जनता किंबहुना त्यांच्या कार्यकर्त्याचा विकास तरी हे करतील का? हा .. प्रश्न? आहे . कार्यकर्ता हा रस्त्यावर bomlatch राहणार …,नेते एकमेकांवर आरोप- प्रात्योप करून , कार्याक्रत्याच्या पाठीत खंजीर खुपसून , सरतेशेवटी एकाच थाळीत खाणार आहेत .., हे तुपाशी कार्यकर्ता उपाशी ..! आत्ता कोणता झेंडा घेवू हाती?…..,पांढरा …!कारण सारे भगवे, हिरवे ,पिवळे ,निळे एक झालेत सत्तास्व्रार्ता साठी …, यांच्यासाठी पांढरा घ्यावयाच लागेल …!

close