पवारांची गुगली, ‘सेनेचे नेते एक दोनदा भेटले होते’

November 8, 2014 8:11 PM0 commentsViews:

pawar_on_sena08 नोव्हेंबर : एकीकडे सत्तेत सहभागासाठी भाजप आणि शिवसेनेनं ‘तह’ सुरू असतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता गुगली टाकली आहे. राज्यातलं सरकार अस्थिर होईल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही, असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलंय. तसंच शिवसेनेच्या नेत्यांनी एक दोनदा भेट घेतली होती पण कोणताही प्रस्ताव दिला नाही असा खुलासाही पवारांनी केला. ते पुण्यात बोलत होते.

राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन वेगळीच इनिंग खेळली. एवढेच नाहीतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार गैरहजर राहतील असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. आता विश्वासदर्शक ठरावाची वेळजवळ आल्यानंतर भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेनं पाठिंबा देण्याचा निर्णय न घेतल्यामुळे भाजपने सेनेला सोबत घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून मंत्रिपदाचे ऑफर दिली जात आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादीने आज वेगळीच भूमिका मांडली. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राज्यातलं असलेलं सरकार अस्थिर होईल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीने अगोदर बिनशर्त पाठिंबा दिलाय. जर शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली नाहीतर राष्ट्रवादीचा पर्याय भाजपपुढे आहे. त्यामुळे पवारांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झालंय. पवारांच्या या वक्तव्यामुळे सेनेवर एकाप्रकार दबाव पाडण्याचा प्रयत्न झालाय. पवार पुढे म्हणतात, शिवसेनेचे नेते एक दोनदा भेटले होते पण त्यांनी कोणताही असा प्रस्ताव दिला नाही. जरी दिला तरी त्यात आम्हाला रस नाही असा खुलासाही पवारांनी केला. तर आमचे नेते कुणालाही भेटले नाही. जरी, भेटले असतील तर व्यक्तीगत कामासाठी भेटले असतील अशी प्रतिक्रिया सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close