मुंबईत डेंग्यूमुळे चिमुकलीचा मृत्यू

November 8, 2014 9:24 PM0 commentsViews:

saamya308 नोव्हेंबर : मुंबईत डेंग्यूचा आणखी एक बळी गेलाय. साम्या शेख या चार महिन्यांच्या चिमुकलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय. तिचा केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती दोन दिवसांपासून केईएममध्ये उपचार घेत होती.

साम्या कुर्ल्याच्या कुरेशी नगरमध्ये राहत होती. त्या परिसरात पाहणी केल्यावर तिथे घाणीचं साम्राज्य दिसलं. इथल्या स्थानिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागावर आणि स्थानिक नगरसेवकांवर टीका केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close