केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार

November 9, 2014 12:12 PM0 commentsViews:

bjp2_650_051914055016

09  नोव्हेंबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला-वहिला मंत्रिमंडळ आज रविवारी विस्तार होत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार 20 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात आज रविवारी दुपारी 1.25 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

येत्या 24 नोव्हेंबरला संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार तसंच काही फेरबदल केले जाणार आहेत. भाजपचे मनोहर पर्रिकर आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह 20 नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.

मनोहर पर्रिकर यांनी काल (शनिवारी) गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मोदी सरकारमध्ये त्यांच्यावर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पर्रिकरांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. तसंच माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु, ऑलिम्पिक पदक विजेता राज्यवर्धन सिंह राठोड तसंच गायक बाबूल सुप्रियो यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.  त्याचबरोबर शिवसेना खासदार अनिल देसाई यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. आज दुपारी दिड वाजता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होतोय. त्यासाठी देसाई दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सध्या 45 मंत्री आहेत. त्यापैकी 23 कॅबिनेट तर 22 राज्यमंत्री आहेत. स्वतंत्र प्रभार असलेले 10 राज्यमंत्री आहेत.

दरम्यान, शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्र्यांसाठी चहापानाचे आयोजन केले होतं.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होतोय, यात कुणा-कुणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
 1. मनोहर पर्रिकर
-गोव्याचे माजी मुख्यमंत्री
-गोव्याचे दोन वेळा मुख्यमंत्री
-गोवा भाजपचा चेहरा
-मिस्टर क्लिन इमेज
-संघाशी जवळक
-संरक्षण मंत्रीपद मिळण्याची शक्यता

2. मुख्तार अब्बास नकवी
-भाजपचे राज्यसभा खासदार
-उत्तर प्रदेश रामपूरचे खासदार
-भाजपचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ता
-वाजपेयी सरकारमध्ये मंत्री

3. जे पी नड्डा
-पक्षप्रवक्ते आणि महासचिव
-हिमाचलहून राज्यसभेचे खासदार
-हिमाचल सरकारमध्ये कायदामंत्री
-तीन वेळा आमदारकी
-1993 मध्ये पहिल्यांदा आमदार

4. हंसराज अहिर
-चंद्रपूरमधून खासदारकी
-तिसर्‍यांदा खासदार
-1996मध्ये पहिल्यांदा खासदार
-कोळसा घोटाळ्याचा प्रश्न यूपीए सरकारमध्ये लावून धरला
-कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार मिळण्याची शक्यता

5. चौधरी बिरेंद्र सिंह
-हरयाणाचे दिग्गज जाट समुदायाचे नेता
-जवळपास 42 वर्ष कॉंग्रेसशी निगडित राहिले
-हरयाणा निवडणुकीआधी भाजप प्रवेश
-सध्या राज्यसभा खासदार

6. जयंत सिन्हा
-झारखंड हजारीबागमधून खासदार
-ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र
-पहिल्याच निवडणुकीत खासदार
-25 वर्षअमेरिकेत वास्तव्य

7. कर्नल सोनाराम चौधरी
-राजस्थान मेवाड प्रांतातले दिग्गज जाट समुदायाचे नेते
-बाडमेरमधून भाजप सांसद
-राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे विश्वासू
-बाडमेरमधून जसवंत सिंह यांचा पराभव केला
-कॉंग्रेसच्या तिकीटावर तीन वेळा बाडमेरचे खासदार
-लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपत प्रवेश

8. सांवर लाल जाट
-अजमेरहून भाजप खासदार
-कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांना एक लाख मतांनी हरवलं
-राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या विश्वासू
-मेवाड भागातले जाट समुदायाचे प्रमुख नेते

9. राज्यवर्धन सिंह राठौड
-जयपूर ग्रामीणमधून भाजप खासदार
-पहिल्याच निवडणुकीत विजयी
-लोकसभा निवडणुकीआधेी लष्करातून सेवानिवृत्ती घेऊन निवडणूक लढवली
-प्रसिद्ध नेमबाज
-2004 अथेन्स ऑलिपिकमध्ये नेमबाजीत पदक

10 . गजेंद्र सिंह शेखावत
-जोधपूरमधून भाजप खासदार
-राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे विश्वासू

11. रामकृपाल यादव
-बिहार पाटलीपुत्रहून भाजप खासदार
ओबीसी नेते
-लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारतीचा केला पराभव
-निवडणुकीआधी आर जेडी सोडून भाजपत प्रवेश
तिसर्‍यांदा खासदार
-अनेक संसद समितींमध्ये सहभाग

12 . गिरीराज सिंह
-बिहार नवादाहून भाजप खासदार
-पहिल्यांदाच खासदारकी
-बिहार सरकारमध्ये दोनदा मंत्री
-मोदींचे कट्टर समर्थक
-केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता

13 . राजीव प्रताप रुडी
-बिहारमधील सारणमधून भाजप खासदार
-तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशचे प्रभारी
-लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांचा केला पराभव
-वाजपेयी सरकारमध्ये विमान उड्डाणमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली होती

14 . मोहन कुंडारिया
-गुजरातमधील राजकोटचे भाजप खासदार
-पहिल्यांदाच खासदारकी
-पाच वेळा आमदारकी
-गुजरातमध्ये मोदी सरकारच्या काळातही  मंत्रीपद
-पटेल समुदायाचे दिग्गज नेते

15. विजय सांपला
-पंजाबच्या होशियापुरचे भाजप खासदार
-पहिल्यांदाच खासदारकी
-पंजाब भाजपचा दलित चेहरा
-1990 मध्ये भाजपमध्ये प्रवेश

16. साध्वी निरंजन ज्योती
-उत्तर प्रदेशच्या फतेहपूरचे भाजप खासदार
-2012 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत हमीरपूरहून आमदार
-निषाद समाजाच्या नेत्या

17 . बंडारु दत्तात्रेय
-सिकंदराबादहून भाजप खासदार
-तेलंगणा भाजपचे अध्यक्ष
-आंध्र आणि तेलंगणाचे दिग्गज भाजप नेते
-चौथ्यांदा खासदार
-वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय राज्यमंत्री

18. बाबुल सुप्रियो
आसनसोलहून भाजप खासदार
हिंदी आणि बंगाली चित्रपट गायक
पहिल्यांदा पश्चिम बंगालच्या आसनसोल जागेवर निवडणूक लढवली
भाजपला पश्चिम बंगालमध्ये एकमेव मिळालेली सीट

19. अजय टमटा
-अल्मोडाहून भाजप खासदार
-उत्तराखंडमधला भाजपचा तरुण चेहरा
-लोकसभा निवडणूक दुसर्‍यांदा लढवली
-पहिल्यांदाच खासदारकी
-2012 मध्ये उत्तराखंड विधानसभा निवडणूकीत विजय

20. वाय एस चौधरी
-टीडीपचे राज्यसभा खासदार
-चंद्राबाबू नायडूंचे विश्वासू
-आंध्र प्रदेशमधले मोठे उद्योगपती
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close