शपथविधीवर शिवसेनेचा बहिष्कार, एनडीएतून बाहेर?

November 9, 2014 3:18 PM2 commentsViews:

modi-uddhav

09  नोव्हेंबर  : अखेरच्या क्षणापर्यंत घोळ घातल्यानंतर शिवसेनेनं केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत पोहोचलेले खासदार अनिल देसाई यांना माघारी परतण्याचे आदेश दिले. त्यामुळे देसाई एअरपोर्टवरूनच माघारी फिरले. त्यामुळे शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना विधिमंडळ गटाची संध्याकाळी बैठक होत आहे. या बैठकीत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय होऊ शकतो. राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट केली नसल्यानं सहभाग होणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली. भ्रष्टवादी अशी टीका करणार्‍या राष्ट्रवादीशीच भाजपची छुपी युती आहे, असा आरोपही शिवसेनेनं केला. तर देसाईंना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळणार असल्यानं शिवसेना नाराज असल्याचंही बोललं जात आहे.

राज्यात सत्तेमध्ये वाटा द्या, मग केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेऊ, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला होता. तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याचं पाहू अशी भूमिका भाजपनं घेतली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे उद्धव ठाकरे यांना दाद देत नाहीत, असा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. तर महाराष्ट्राविषयी पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी सांगितले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Maharashtrian

    shivsena takes right decision

  • Adv Nachiket

    शिवसेनेने अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. तसंही सध्या सर्वच पक्षांसाठी कठोर परीक्षेचा काळ सुरु आहे. तर आता ह्या परीक्षेत खरे उतरून स्वत:ला सिद्ध करण्याची आणखी एक संधी शिवसेनेला मिळेल आणि उद्धवजींचं १८० आमदार निवडून आणण्याचं स्वप्न पूर्ण होईल.

close