उद्धवंचा आदेश धुडकावला, सुरेश प्रभूंनी घेतली शपथ

November 9, 2014 3:16 PM6 commentsViews:

suresh_prabhu09 नोव्हेंबर : एकीकडे शिवसेनेनं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर बहिष्कार घातला पण सेनेच्या या आदेशालाच सेनेचे नेते सुरेश प्रभूनी वाटाण्याचा अक्षदा दाखवल्या. सुरेश प्रभू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी प्रभू यांच्या नावासाठी आग्रही होते, तर शिवसेनेनं मात्र अनिल देसाई यांचं नाव पुढे केलं होतं. प्रभू यांच्याकडे केंद्रात रेल्वेसारखं अतिशय महत्त्वाचं खातं सोपवलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.

अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना सुरेश प्रभू यांच्याकडे नदी जोड प्रकल्पाची धुरा सोपवण्यात आली होती. आताही त्यांच्याकडे मोदींच्या धोरणाला दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल अशी अपेक्षा आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  आता पुन्हा युती करण्याची संधी जर का शिवसेनेने ठोकरली तर मात्र शिवसेनेला फारच हानीकारक होईल. शिवसेनेला मजबूत करण्याची ही अखेरची संधी आहे.

 • Sham Dhumal

  शिवसेनेचा दबावतंत्राचा अतिरेक चालू राहिल्यास अनेक आमदार आणि खासदार शिवसेनेला “जय महाराष्ट्र” करतील.

 • Sham Dhumal

  भाजप ला पाठींबा देऊन शिवसेनेला वाचविण्याची ही अखेरची संधी आहे.

 • Sham Dhumal

  भलते वक्तव्य करुन शिवसेना आपण आपला अपमान करुन घेत आहे.
  दबावतंत्राचा अति वापर शिवसेनेला त्रासदायद ठरत आहे

 • Sham Dhumal

  राष्ट्रवादिबाबत भूमिका स्पष्ट करा असे उध्दव ठाकरे भाजपला विचारतात. परंतु शिवसेनेचे नेतेच शरद पवार व आजित पवार यांना जाऊन भेटतात.

 • umesh jamsandekar

  सुरेश प्रभू हे अती हुशार आणि सत्तेचे भुकेले . निलेश राणे यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर ते नवीन नोकरीच्या शोधात होते. ती त्यांना नरेंद्र मोदींच्या वशिल्याने मिळाली. स्वतः साठी जगणारा माणूस दुसऱ्याचा विचार करत नसतो. त्यामुळे यात सेनेचा काय दोष.

close