सुरेश प्रभूंचा शिवसेनाला ‘जय महाराष्ट्र’,भाजपमध्ये दाखल

November 9, 2014 4:12 PM2 commentsViews:

suresh_prabhu409 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यंाचा आदेश धुडकावून एनडीए सरकारच्या शपथविधीत शपथ घेऊन सुरेश प्रभूंनी सेनेला एकच धक्का दिला. प्रभूंनी शपथ घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याअगोदरच सुरेश प्रभूंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’केलाय. प्रभूंनी सेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय.

राज्यात सत्तेचा तिढा सुटत नसल्यामुळे शिवसेनेनं आज केंद्राच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे शिवसेना आता एनडीएमधून बाहेर पडणार अशी दाट शक्यता निर्माण झालीये. त्यातच आज झालेल्या केंद्रीय मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला सेनेच्या नेत्यांनी जाऊ नये असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यांच्या आदेशाची पुर्तता करत अनिल देसाई दिल्ली विमानतळावरुन माघारी परतले. पण याला अपवाद राहिले सुरेश प्रभू. सुरेश प्रभू यांनी उद्धवंचा आदेश धुडकावून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी प्रभू यांच्या नावासाठी आग्रही होते. प्रभू यांच्याकडे केंद्रात रेल्वेसारखं अतिशय महत्त्वाचं खातं सोपवलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. इतके दिवस सत्तेतून दूर राहिल्यानंतर आज सत्तेत सहभागीची संधी मिळत असल्यामुळे प्रभूंनी सेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. प्रभूंनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे उद्धव यांनी काही निर्णय घेण्याच्या अगोदरच काही तासांत प्रभू सेनेतून भाजपमध्ये दाखल झाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • http://Hashkart.com Kishor Ghule

    Gaddar sala, Jya Shivsene mule 4 vela khasdar zala tyanna sodule Mantripadasathi sodun gela ha gaddar.. aso Nashik Pune Train Route Kadhi complete kartay???

  • Swapnil

    Je bolali khara bolali

close