उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

November 9, 2014 7:04 PM2 commentsViews:

uddhav_on_ncp

अपडेट

 – हिंदुत्ववादी शक्तींचं विभाजन होऊ नये, ही आजही इच्छा – उद्धव ठाकरे
– आम्ही कुणाला बांधील नाही -उद्धव ठाकरे
– सत्ता असो वा नसो मराठी माणसासाठी काम करत राहणार -उद्धव ठाकरे
– अनंत गीतेंचा निर्णय लवकरच कळेल -उद्धव ठाकरे
– सुरेश प्रभू भाजपमध्ये गेले हे दुर्देव -उद्धव ठाकरे
– भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर विरोधी बाकावर बसणार -ठाकरे
– लाचारी पत्कारून सत्तेत सहभागी होणार नाही -उद्धव ठाकरे
– विधानसभेचा अध्यक्षाची निवड झाल्यावरच पाठिंब्याचा निर्णय
– 12 नोव्हेंबर रोजी निर्णय स्पष्ट होईल -उद्धव ठाकरे
– आजपर्यंत काय घडलं कसं घडलं हे सगळं तुम्हा सगळ्यांना माहित आहे -उद्धव ठाकरे
– हिंदू संपवण्याची ताकद वाढत आहे, ही शक्ती वाढत आहे -उद्धव ठाकरे
– शरद पवारांनी अगोदरच भाजपला पाठिंबा जाहीर केलाय -उद्धव ठाकरे
– भाजप जर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार असेल तर आम्हाला भाजपसोबत जाणं अवघड जाईल -उद्धव ठाकरे
– राष्ट्रवादीचा पाठिंबा जर भाजपनं घेतला तर शिवसेना विरोधी पक्षातच बसणार, उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट
– भाजपनं आधी स्पष्ट करावं राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार आहात की नाही ?-उद्धव ठाकरे
– महाराष्ट्राचा अपमान होत असेल तर आम्ही विरोधी पक्षात बसू -उद्धव ठाकरे
– शिवसेना हिंदुत्वाला कायम साथ देणार -उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या सर्व आमदारांचा विरोधात बसण्याचा उद्धव ठाकरेंना आग्रह

- एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड
– शिवसेनाभवनाबाहेर अमित शहा मुर्दाबादच्या घोषणा
– शिवसैनिकांची भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

- शिवसेना खासदार अनिल देसाई मुंबईत दाखल
– शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत
– उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेही सेनाभवनात पोहचले

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • ramesh dedhe

    yes amit shaha murdabad

  • Adv Nachiket

    बुद्धीबळाच्या खेळाला कबड्डीचे नियम लावून काय उपयोग? अमित शाह मुर्दाबाद म्हणून मंत्रीपदं मिळणार आहेत का?

close