1 जुलैपासून एअर इंडिया कर्मचार्‍यांचा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

June 17, 2009 1:58 PM0 commentsViews: 2

17 जून एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांनी एक जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पगार पंधरा दिवस उशिरा मिळणार असल्या कारणाने कर्मचार्‍यांनी ही भूमिका घेतली आहे. एअर इंडिया व्यवस्थापनाला गेल्या वर्षभरात बराच मोठा आर्थिक तोटा झाला होता. त्यामुळे एअर इंडियाने कर्मचार्‍यांचा जुलै महिन्याचा पगार उशिरा घेण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या या निर्णयावर एअर इंडियाला गेल्या वर्षभरात बराच मोठा तोटा झाल्यामुळे वेतन काही काळ थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं नॅशनल एव्हिएशन कंपनी ऑफ इंडियानं सांगितलं आहे. या आर्थिक वर्षात एअर इंडियाला सुमारे चार हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एअर इंडियाच्या पगार पंधरा दिवस उशीरा देण्याच्या निर्णयावर एअर इंडियातले कर्मचारी नाराज आहेत. त्याप्रमाणे कंपनी तोट्यात गेल्याचा ठपका कर्मचार्‍यांवर टाकला जात आहे, असा आरोप एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉयीज् युनियनने केला आहे. परिणामी मॅनेजमेंटविरोधात देशव्यापी संप केला जाईल, असंही युनियनने म्हटलं आहे.

close