एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड

November 9, 2014 8:49 PM1 commentViews:

eknath_shinde09 नोव्हेंबर : शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही याचा घोळ आणखी वाढला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत सहभागाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात ठेवला आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील कोपरी पाचपाखडीचे आमदार एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळातील गटनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

आज शिवसेनेच्या आमदारांची सेनाभवनावर बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावावर एकमुखाने निवड करण्यात आली.

तसंच विधानसभाचा अध्यक्षाची निवड झाल्यावर पाठिंब्याचा निर्णय 12 नोव्हेंबर रोजी घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • vikram

    congratulation bhai,the most deserved candidate has been selected by entire shivsena and Mr udhhav thackrey himself.

close