शिवसेनेनं मोदींवर विश्वास ठेवायला पाहिजे होता -फडणवीस

November 9, 2014 9:38 PM4 commentsViews:

fadanvis_on_sena09 नोव्हेंबर : केंद्रीय मंत्रिपद देऊन सुद्धा शिवसेनेनं ते नाकारलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निमंत्रण देऊन सुद्धा पलीकडेच्या बाबी योग्य प्रकारेच होतील असा विश्वास शिवसेनेनं ठेवायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच सत्तेत सहभागाबाबत जी काही चर्चा आहे. त्यावरच चर्चा व्हावी. पण पद, संख्या, खाती याच्यावर आधारीत चर्चा होऊ नये अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

भाजपने ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या राष्ट्रवादीचा पाठिंबा जर घेतला तर आम्ही विरोधी बाकावर बसू अशी भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. सेनेच्या भूमिकेनंतर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीडियाशी बोलतांना सेनेच्या निर्णयावर दु:ख व्यक्त केलं. शिवसेनेच्या समंतीनेच अनिल देसाईंचं नाव मंत्रिपदाच्या शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे पाठवण्यात आलं होतं. पण ऐन वेळी अनिल देसाई अनुपस्थीत राहुन शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. हे आमच्या करिता दुख:द आणि दुर्देवी आहे. खरं तर पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून सरकारमध्ये सामिल व्हायला हवं होतं अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदींकडून निमंत्रण आल्यानंतर पलीकडच्या सगळ्या बाबी योग्य प्रकारेच होतील असा विश्वास सेनेनं ठेवायला हवा होता. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याबाबतची जी काही चर्चा आहे. जे काही तात्विक मुद्दे आहे. त्यावरच चर्चा व्हावी. पण पद, संख्या, खाती याच्यावर आधारीत चर्चा होऊ नये असं आमचं मत आहे असं फडणवीस म्हणाले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Rajaram Khanolkar

  भाजपा आतताईपणा करताय. आपण शपथविधी करायचा आणि आपले मंत्री खाते वाटप करायचा आणि दुसर्‍याला सांगायच कि विनाअट अंधला विश्वास ठेवा. आता शिवसेनेकडे खाती नसतील तर शिवसेना जनतेची सेवा कशी करणार. आणि पाठिंबा दिला तर चुकीच्या धोरणंना विरोध कसा करणार. आपणच कोडा घालायचा आणि बॉम्बालयचा कि शिवसेना अट घालते म्हणून. शिवसेना हा वेगळा पक्षा आहे भाजपची शाखा नाही की मोडी देवेंद्रा वर आंधला विश्वास टाकून बसायला. संघटना जशी भाजपला वाढवायची आहे तशी ती शिवेसेनेला पण. हे समजून ना समजण्या सारखा करते आहे भाजपा. भाजपावले महानगर पालिकेत का पद घेऊन बसले आहेत आणि 95ला युती सरकारात का मंत्री पद घेऊन उपमुख्यमंत्री बनून पाच वर्ष सरकार चालवला. शिवसेनेने विरोधी पक्षा म्हणून उत्तम भूमिका बाजवावी. भाजपला पाठिंबा देऊन खोड्यात अडकवून घेऊ नये.

 • Ramanand Subhashrao Belsare

  भाजपा हा आज सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे आणि जनतेने त्यांच्या वर मोठा विश्वास ठेऊन त्यांच्या हाती आज सत्ता दिली आहे. पण शिवसेनेला राष्ट्र सेवेचे नाही तर फक्त सत्तेची भूक उरलेली वाटत आहे म्हणून भाजपने शिवसेना प्रमुखा सोबत साम्पाग्र न करता त्याच्या नेत्याशी संपर्क करावा आणि आपले बहुमत सिद्ध करावे आणि सत्ता चालवावी.

  • amit

   जनतेने बहुमत दिले नाही हे लक्षात ठेवा ..सत्तेची हाव नसती तर पाठींबा देणाऱ्या पक्षाचा पण खातीवाटप आणि शपथ विधी सोहळा झाला असता पण लोकांना भासवायचे आमची सत्ता आहे ..म्हणून एकट्यानेच सोहळा उरकून घेतला आणि लोकांना सांगायचे आमच्यावर विश्वास ठेवा

 • amit

  सगळे निर्णय दिल्लीत होणार असतील तर महाराष्ट्रात मंत्रिपदे देण्याचा शाही सोहळा कशाला केला ??

close