भूखंड घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा

June 17, 2009 3:40 PM0 commentsViews: 2

17 जून राजकारण्यांमुळेच नैसर्गिक आपत्ती येत आहे, अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका केली आहे. जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी असं भाष्य केलं आहे. कोर्टाचा अवमान करून जर भूखंड मिळवत असाल तर आपल्या सत्तेची मस्ती कुठपर्यंत पोहोचली आहे, याचाच प्रत्यय मलाच नाही तर राज्यातल्या जनतेला येणार आहे, असंही ते म्हणाले आहेत. जर भूखंडाचं राजकारण असंच चालू राहिलं तर शिवसेना त्या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

close