भाजपला पाठिंब्याचा राष्ट्रवादीचा उद्या निर्णय

November 9, 2014 10:40 PM0 commentsViews:

sharad pawar4409 नोव्हेंबर : भाजपला पाठिंबा देण्यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस उद्या (सोमवारी) आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी भवनात पक्षाध्यक्ष शरद पवार आणि गटनेते अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत.

यावेळी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आयबीएन लोकमतला दिली. राष्ट्रवादीने अगोदरच भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

तसंच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार गैरहजर राहतील अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. दोन दिवसांपूर्वीच भाजप सरकार अस्थिर होईल असा कोणताही निर्णय घेणार नाही असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यामुळे आता उद्या शरद पवार काय निर्णय घेता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close