विधिमंडळाचं आजचं कामकाज संपलं, 178 आमदारांनी घेतली शपथ

November 10, 2014 12:19 PM0 commentsViews:

MahaVBhavan

नव्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची आज वादळी सुरूवात झाली. भाजप आणि शिवसेनेतला सत्तेच्या वादाचे पडसाद पहिल्याच दिवशी उमटले. शिवसेना आमदारांनी ढोल-ताशांच्या गजरात विधानभवन परिसरात येत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. आज 178 आमदारांनी शपथ घेतली तर ऊरवरीत आमदार उद्या शपथ घेणार आहेत.

एकीकडे, भाजपबरोबर चर्चा सुरू नसल्याचं शिवसेना आमदार नीलम गोर्‍हे यांनी सांगितलं तसचं विधासभा अध्यक्षपदाची निवडणूकही शिवसेना भाजप विरूद्ध लढवणार असल्याचं गोर्‍हे यांनी स्पष्ट केलं आहे. अशाप्रकारे शिवसेना विरूद्धचा भाजपचा हा सामना रंगतदार होताना दिसतं आहे. दुसरीकडे काँग्रेसने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. यासंबंधाचं पत्र काँग्रेसनं विधिमंडळात सादर केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेसच्या गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील तर उपनेतेपदी विजय वडेट्टीवारांची वर्णी लागली आहे. विखे पाटील यांच्या निवडीमुळे अशोक चव्हाण गटाची सरशी झाल्याचं मानलं जातात.

आतापर्यंतचे ठळक मुद्दे

 • आज 178 आमदारांनी घेतली शपथ , उर्वरीत आमदार उद्या घेणार शपथ
 • विधिमंडळाचं आजचं कामकाज संपलं
 • काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर केला दावा , विरोधी पक्षनेतेपदासाठी सादर केंलं विधिमंडळात पत्र
 • शिवसेनेसोबत अजूनही चर्चा सुरू आहे, लवकरच त्यातून चांगला निष्कर्ष निघेल – राजीव प्रताप रूडी
 • विधानपरिषद सभापती पदावर राष्ट्रवादी सांगणार दावा, सूत्रांची आयबीएन लोकमतला माहिती
 • विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे 27, काँग्रेसचे 21 भाजपचे 9 आणि शिवसेनेचे 6 सदस्य, त्यामुळे सभापती पदावर राष्ट्रवादीने दावा ठोकला तर निवडणुकीत काँग्रेसचे सभापतीपद जाणार
 • राज्यात स्थिर सरकार यावं आणि पुन्हा निवडणुकीचा भार पडू नये म्हणून राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे
  – पाठिंबा देण्यावरुन राष्ट्रवादीत कुठलाही वाद नाही
  – राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांचे मत
  -संध्याकाळी शरद पवार पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहेत राष्ट्रवादीची भूमिका
 • आत्तापर्यंत सर्व नवनिर्वाचित आमदारांनी मराठीतूनच घेतली शपथ
 • आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी संस्कृतमधून घेतली शपथ
 • शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी सलग 12 व्यांदा घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ
 • माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शपथ
 • माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ
 • राष्ट्रवादीचे आमदार आर आर पाटील, अजित पवार यांनीही घेतली शपथ
 • भाजपसोबत चर्चा थांबलेली आहे, शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हेंची माहिती
  – मुख्यमंत्र्यांची भूमिकाही मीडियामधूनच कळली – नीलम गोर्‍ह
  -विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना भाजपच्या विरोधात उमेदवार उभा करणार – नीलम गोर्‍ह
 • बाळासाहेब थोरात यांनी घेतली शपथ, हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा गावितांनी दिली शपथ
 • विधानसभा सदस्यांच्या शपथविधीला सुरुवात
 • आज 150 आमदारांना देणार शपथ
 • अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आमदारांचा गोंधळ, मराठी शाळेत उर्दू शिकवण्याच्या निषेधार्थ वक्फ बोर्डाचे मंत्री एकनाथ खडसेंना देणार हिरवी टोपी भेट, दिवाकर रावते यांनी केली महसूलमंत्री खडसेंवर टीका
 • विरोधी पक्ष ठरलाच नसल्याने मुख्य विरोधी पक्षाच्या बाकांवर शिवसेना आमदारांची तात्पुरती व्यवस्था
 • विधानसभेत निर्माण झाला विरोधी पक्षाचा पेच
 •  सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात
 • अनंत कळसे यांनी घेतली राज्यपालांची भेट
 • ढोल-ताशांच्या गजरात शिवसेनेच्या आमदारांचं विधान भवन परिसरात झालं दाखल
 •  जिवा पांडु गावीत विधानसभेचे हंगामी अध्यक्ष , मुख्यमंत्र्यांच्या उपस्थीतीत राज्यपालांनी दिली शपथ
 • काँग्रेसच्या गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील तर उपनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावांची माणिकराव ठाकरेंनी केली घोषणा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close