प. बंगालमध्ये माओवादींकडून सीपीएमच्या तीन कायकर्त्यांची हत्या

June 17, 2009 4:17 PM0 commentsViews: 1

17 जून पश्चिम बंगालमध्ये माओवादी आणि सीपीएम कार्यकर्त्यांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात तीन सीपीएम कार्यकर्ते ठार झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून हा हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार लालगडबाहेर पसरून पश्चिम मिदनापूरमधल्या बक्सोल भागात पसरला. तिथे बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत माओवाद्यांनी सीपीएमच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या केली. दरम्यान माओवाद्यांनी शेजारच्या बांकुरामध्येही हातपाय पसरायला सुरुवात केल्याची कबुली पश्चिम बंगालच्या गृहसचिवांनी दिली आहे. आदिवासींनी लालगडचा संपूर्णपणे ताबा घेतला आहे. बंगाल सरकारच्या म्हणण्यानुसार बहुतेक माओवादी शेजारच्या झारखंडमधून आलेले आहेत. माओवाद्यांच्या पुढे राज्याचे पोलीसही हतबल झाले आहेत. हिंसाचार टाळण्यासाठी आदिवासींशी चर्चा करायला तयार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. प.बंगालमध्ये माओवाद्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी डाव्यांविरोधात बुधवारी बंद पुकारला होता. पश्चिम बंगालमधल्या ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी चिंता व्यक्त केली आहे.राज्य सरकारने केंद्राकडे सीआरपीएफच्या ज्यादा तुकड्यांची मागणी केली आहे. पण सीआरपीएफची संख्या पुरेशी आहे आणि ते राज्याच्या सुरक्षा दलाला मदत करायला तयार असल्याचं चिदंबरम् यांनी सांगितलं आहे.