विधानसभा अध्यक्षपदासाठी हरीभाऊ बागडेंचं नाव निश्चित

November 10, 2014 5:28 PM0 commentsViews:

haribhau_bagade10 नोव्हेंबर : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून हरीभाऊ बागडेंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हरीभाऊ बागडे औरंगाबादच्या फुलंब्रीचे भाजपचे आमदार आहेत. तर विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी तिघांची नावं चर्चेत आहेत. हरीभाऊ जावळे, चैनसुख संचेती आणि सुभाष देशमुखांचे यांची नावं चर्चेत आहेत.

हरीभाऊ बागडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून युती सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भुषवलं आहे. 2004 विधानसभा निवडणुकीतही बागडे विजयी झाले होते. 10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ज्येष्ठतेनुसार हरीभाऊ बागडे यांना विधानसभेचं अध्यक्षपद बहाल करण्याची शक्यता आहे. मात्र पक्षश्रेष्ठी सांगतील त्याच नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. तर शिवसेनेला विचारात न घेता, दोन अपक्षांना मंत्रिपद देण्यावर भाजपचा विचार सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीये. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपनं देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, गिरीश बापट आणि विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close