ज्ञानोबा आणि तुकोबारायांच्या पालख्यांचा झाला पुण्यात संगम

June 17, 2009 4:23 PM0 commentsViews: 4

17 जून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या पालख्या बुधवारी पुण्यात पोहोचल्या. आळंदीतून भल्या सकाळी माऊलींची पालखी निघाली. तर आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणारी तुकोबारायांची पालखीही पुण्यात पोहोचली. पुणेकरांनी दोन्हीही पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली. या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असणार आहे. माऊलींची पालखी भवानी पेठेतल्या पालखी विठोबा मंदिरात तर तुकोबारायांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरात विसावणार आहे. पालखी सोहळ्यासोबतच्या 600 दिंड्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असणार आहे. या मुक्कामानंतर माऊलींची पालखी सासवडमार्गे तर तुकोबांची पालखी मुंढवामार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

close