ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडिया जाहीर

November 10, 2014 11:59 PM0 commentsViews:

team india4410 नोव्हेंबर : श्रीलंका सीरिजनंतर डिसेंबर महिन्यात भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याला सुरूवात होणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 टेस्ट खेळणार आहे. या दौर्‍यासाठी टीम इंडियाची निवड केली गेलीये. मात्र या दौर्‍यात गौतम गंभीरला पुन्हा डच्चू देण्यात आलाय.

दुखापतीमुळे महेंद्रसिंग धोणी पहिल्या टेस्टला मुकणार आहे. तर त्याच्या अनुपस्थितीत विराट कोहलीकडे टीम इंडियाची धुरा असेल. दुलीप ट्रॉफीमध्ये दोन सेंच्युरी ठोकणार्‍या के एल राहुलला टीममध्ये संधी मिळालीये. तर शिखर धवन आणि मुरली विजय या ओपनर्सनंही आपली जागा राखली आहे. भारताच्या मिडल ऑर्डरची भिस्त असेल ती चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैनावर. तर विकेटकिपिंगमध्ये धोणीला नमन ओझा आणि वृद्धिमान सहा असे दोन पर्यायही निवडण्यात आले आहेत. स्पिनर करन शर्मानंही टीममध्ये जागा पटकावली आहे.. तर अश्विन, जडेजाच्या साथीनं भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, उमेश यादव आणि वरुण ऍरॉनवर भारतीय बॉलिंगची मदार असेल.

अशी असेल टीम इंडिया
– महेंद्रसिंग धोणी (कॅप्टन), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान सहा, नमन ओझा, आर अश्विन, करन शर्मा, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरुण ऍरॉन

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close