विधानसभा अध्यक्षपदासाठी सेना भाजप आमने-सामने ?

November 11, 2014 10:17 AM1 commentViews:

vidhan

LIVE UPDATES :

 • भाजप, शिवसेना आणि काँग्रेसकडून अर्ज
 • आज विधानसभा अध्यक्षपदासाठीचे 3 अर्ज दाखल
 • उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव
 • फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार
 • उद्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस
 • 287 पैकी 283 आमदारांनी घेतली विधीमंडळ सदस्यत्वाची शपथ
 • विधानसभेचं आजचं कामकाज संपलं
 • विधानसभा अध्यक्षपद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही – सुनील तटकरे
 • अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याबद्दल शिवसेनेने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचे मानले आभार
 • शिवसेनेकडून विजय औटी यांनी  भरला अर्ज
 • महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेस सोडून इतर कुठल्याही पक्षाचा पाठिंबा घेण्यास भाजप तयार, राजीव प्रताप रुडी यांची प्रतिक्रिया
 • भाजपतर्फे हरीभाऊ बागडेंनी भरला विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज
 • ‘जय विदर्भ’ याची आपण नोंद घेत नाही, विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी केलं स्पष्ट
 • कुणालाही स्मरुन घेतलेल्या शपथीची आपण नोंद घेत नाही
 • शिवसेना आमदारांच्या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत वाढवली
 • ‘जय विदर्भा’चा नारा देणार्‍या आमदारांना अपात्र ठरवा
 • विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवून शिवसेनेची मागणी
 • राष्ट्रवादीने अध्यक्षपदाचा उमेदवार दिल्या तर काँग्रेस त्यांना पाठिंबा देईल, मात्र सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही – माणिकराव ठाकरे
 • विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे विजय औटी अर्ज दाखल करण्याची शक्यता.
 • विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

11 नोव्हेंबर :  विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल केला जाणार आहेत. यात शिवसेना आणि भाजप आमने- सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण विधानसभा अध्यक्षपदावर शिवसेना दावा करण्याची शक्यता आहे. त्याचं बरोबर आज 288 पैकी उर्वरित 110 आमदार विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. कालच्या आधिवेशनात 178 आमदारांची शपथविधी पार पडला.

विरोधी पक्षनेतेपदाच्यासोबतचं सेना आता विधानसभा अध्यक्षपदासाठीही अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा उमेदवाराला विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाते. मात्र, सद्यस्थितीत विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. 122 सदस्यांसह भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेने या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेतली तर शिवसेना आणि भाजप आमने सामने येणार आहेत. भाजपच्या वतीने औरंगाबाद येथील फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी निश्चित झालंय तर दुसरीकडे शिवसेना भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत विधानसभा अध्यक्षपदासाठी पारनेरचे आमदार विजय औटी यांच नाव देईल, अशी शक्यता व्यक्त होते आहे.

दरम्यान उद्या म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्यावेळी सरकारची खरी कसोटी उद्या लागणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Ravi Kesarkar

  महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेस सोडून इतर कुठल्याही पक्षाचा पाठिंबा घेण्यास भाजप तयार, राजीव प्रताप रुडी यांची प्रतिक्रिया
  म्हणजे आता तुम्हाला राष्ट्रवादी चालणार (कारण ती कॉंग्रेस नाही ती राष्ट्रवादी काँग्रेस आहे म्हणून) तुम्ही गेली १५ वर्ष राष्ट्रवादीला शिव्या शाप , भ्रष्टाचारी म्हणणारे आता हे सगळे थांबणार …वारे … वा रुडी आणी भाजप तुमच्या आपत आणी शाश्वत धर्माला सलाम !!

close