कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेतील हलगर्जीपणामुळे 8 महिलांचा मृत्यू

November 11, 2014 11:27 AM0 commentsViews:

chatisgard1

11 नोव्हेंबर :  छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका रुग्णालयात नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतर 8 महिलांचा मृत्यू झाला असून 25 महिलांची प्रकृती गंभीर आहे. आरोग्य विभागातील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे आठ महिलांना जीव गमवावा लागला आहे.

बिलासपूर येथील हॉस्पिटलमध्ये शनिवारी सरकारी कुटुंबनियोजनाच्या शिबीरादरम्यान 80 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यापैकी काही जणींना ताप आला तर काहींना वेदना होऊ लागल्या. त्या महिलांची प्रकृती बिघडतच गेली आणि सोमवारी आठ जणींचा मृत्यू झाला. आणखी 25 महिलांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्ररणी चार डॉक्टर निलंबित आलं असून चौघांच्याही विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्तीसगडमधील बिलासपूर हा आरोग्यमंत्री अमर अग्रवाल यांचा मतदारसंघ आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close