विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत

November 11, 2014 12:36 PM0 commentsViews:

CONG-BJP-SENA

11 नोव्हेंबर : विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजतोय तो विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आता तिहेरी लढत रंगण्याची शक्याता आहे. भाजपातर्फे हरिभाऊ बागडे आणि शिवसेनेतर्फे शिवसेनेच्या विजय औटी यांनी अर्ज भरल्यानंतर आता काँग्रेसतर्फे धारावीच्या आमदार वर्षा गायकवाडही अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. विधानसभा अध्यक्षाची बुधवारी निवड होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ पण शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार नाही, असं काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र विधानसभा अध्यक्षपद निवडणूक राष्ट्रवादीने आपला उमेदवार न दिल्याने काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीनंतर विधानसभा अध्यक्षपदाचा मान कोणत्या पक्षाकडे जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत होती. मात्र, शिवसेनेनं त्याला आक्षेप घेतला. दुपारी बारा वाजेपर्यंत सदस्यांचा शपथविधी पूर्ण होणार नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवा, अशी मागणी शिवसेनेनी केली. त्यांनी या मागणीवरून सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत वाढविण्यात आली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close