शायनी आहुजाच्या कोठडीत वाढ

June 18, 2009 9:29 AM0 commentsViews: 6

18 जून, मुंबई मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शायनी आहुजा याच्या न्यायालयीन कोठडीत 2 जूलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शायनीचा पोलीस कोठडीतला गुरुवारचा शेवटचा दिवस होता. त्याला अंधेरी कोर्टात नेलं असता हा निर्णय देण्यात आला आहे. मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असणारा बॉलिवुड अभिनेता शायनीला त्याची पत्नी अनुपमा अहुजा हीने पाठिंबा दिला आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत शायनी पूर्णपणे निर्दोष असल्याचं सांगत स्त्रियाही बलात्कार करू शकत नाही का, असा प्रश्न अनुपमा अहुजाने उपस्थित केला. दरम्यान आपला आपल्या पतीवर पूर्ण विश्‍वास असल्याचं, अनुपमा अहुजाने म्हटलं आहे. मोलकरणीवर बलात्कार केल्याचा शायनी आहुजावर आरोप आहे.शायनीच्या मोलकरणीवर बलात्कार झाल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये सिद्ध झालं आहे. तसंच 'आपल्यावर शायनीने बलात्कार केला असल्याची तक्रार मोलकरणीने ओशिवारा पोलीसस्टेशनमध्ये नोंदवली होती. तसा गुन्हाही त्याच्यावर दाखल झाला आहे.

close