‘जय विदर्भ’च्या घोषणा देणार्‍या भाजप आमदारांना अध्यक्षांनी बजावले

November 11, 2014 2:44 PM0 commentsViews:

BJP vidhansabha

11 नोव्हेंबर : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी शिवसेनेने भाजपविरोधातील आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. शपथविधीदरम्यान ‘जय विदर्भ’ची घोषणा देणार्‍या आमदारांना अपात्र ठरवा, अशा मागणीचं पत्र शिवसेनेने विधानसभा सचिवांना पाठवलं आहे. शपथ घेताना राज्याच्या अखंडत्वाची शपथ घेतो, तेव्हा विदर्भाचा नारा देणं हे घटनेच्या विरूद्ध आहे असं शिवसेनेनं पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

शपथविधीला दिलेल्या नमुन्याच्या व्यतिरिक्त आमदार कुणालाही स्मरून शपथ घेत असतील तर त्या शब्दांची दफ्तरी नोंद होणार नाही असं सांगत आपण अखंड महाराष्ट्राच्या सभागृहात बसलो आहोत. त्यामुळे विभागवार उल्लेख टाळावा अशी तंबीही विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनी आमदारांना दिली. तसंच एकदा ताकीद  देऊनही पुन्हा ‘जय विदर्भ’ अशा घोषणा दिल्यास आमदारांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदेंनी विधानसभा अध्यक्षांचे आभार मानले आहेत. विदर्भाची घोषणा देण्यावरही आमचा आक्षेप होता, त्यावरुन अध्यक्षांनी निलंबनाची तंबी दिलेली आहे, त्यासाठी त्यांचे आभारी आहोत, असं शिंदे म्हणाले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close