शिवकालीन 12 मोटेची विहीर

November 11, 2014 4:25 PM0 commentsViews:

11 नोव्हेंबर : सातारा शहरापासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर लिंब गावामध्ये शिवकालीन स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना बघायला मिळतो. या गावातली बारा मोटेची विहीर आणि तिच्यावर बांधलेला महाल थक्क करून जातो. सतराव्या शतकात श्रीमंत विरूबाई भोसले यांनी ही विहीर बांधून घेतली. या विहिरीचा आकार शिवलिंगासारखा आहे. विहिरीत खाली उतरायला दगडी पायर्‍या आहेत. विहिरीत उतरताच सुरुवातीला भक्कम कमान दिसते. कमानीतून उतरल्यानंतर आपण उपविहिरीत जातो. तिच्या तळापर्यंत जाणार्‍या पायर्‍या आहेत. त्यानंतर पुढे मुख्य विहीर आहे.

सध्या ही विहीर पाण्याने भरलेली आहे. या विहिरीच्या वर राजमहाल बांधलेला आहे. या विहीरीतूनच चोरवाटेने या महालाकडे जाणार्‍या दगडी पायर्‍या आहेत. ही विहीर पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येत आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close