सेनेचा घोळ अजूनही कायम, बुधवारी करणार निर्णय जाहीर

November 11, 2014 11:01 PM0 commentsViews:

Uddhav thackrayaa11 नोव्हेंबर : सत्तेत सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय अजूनही शिवसेनेनं गुलदस्त्यात ठेवल्यामुळे आणखी घोळ वाढला आहे.
भाजपला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत बुधवारी सकाळी निर्णय जाहीर करू असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. तसंच सर्व 63 आमदारांनी सेनेचे उमेदवार विजय औटींनाच मतदान करा असा व्हिप सेनेनं जारी केलाय.

मुंबईच्या नरीमन पॉईंट भागात असलेल्या शिवालय या सेनेच्या कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सेना नेत्यांनी पुन्हा भाजपच्या निर्णयाचा वाट पाहण्याच निर्णय घेतला. उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत वाट पाहणार आणि त्यांनंतर आमदारांना पक्षाचा निर्णय कळवणार असल्याचं ठरलंय. या बैठकीनंतर सेनेचे गटनेते एकनाथ शिंंदे,दिवाकर रावते, रामदास कदम, रविंद्र वायकर, सुभाष देसाई ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर बुधवारी सकाळी निर्णय जाहीर करणार असं सेनेनं स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close