डेंग्यूला मीडियानंच मोठं केलं, मुंबईच्या महापौरांची मुक्ताफळं

November 11, 2014 6:32 PM0 commentsViews:

11 नोव्हेंबर : डेंग्यू हा साथीचा रोग आहे, त्याला मीडियानं मोठं केलंय अशी मुक्ताफळं मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी उधळली. आंबेकर यांनी आज (मंगळवारी) घाटकोपर इथल्या राजावाडी हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत सभागृह नेत्या कृष्णा विश्वासरावही होत्या. यावेळी त्या बोलत होते.

राज्यभरात डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या राजधानी मुंबईत डेंग्यूनं थैमान घातलंय. डेंग्यूचं थैमान रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे पण याला अपवाद मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर ठरल्या आहे. डेंग्यू सारखा साथीचा आजार आहे तो मीडियाने भंयकर मोठा करून टाकला आहेत असं खापरंच आंबेकर यांनी मीडियावर फोडलंय. मुंबईत आतापर्यंत 10 हून अधिक जणांचा डेंग्यूमुळे बळी गेलाय. तर खुद्ध महापालिकेनंच घरात जर डेंग्यूच्या आळ्या आढळल्या तर अटक करण्यात येईल असा निर्णय घेतला होता. राज्य सरकारनेही डेंग्यू रोखण्यासाठी पालिकेला आदेश दिले आहे. पण मुंबईच्या पहिल्या नागरिक महापौर स्नेहल आंबेकर यांनी मीडियावर खापरं फोडून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close