पुणे तिथे टोल उणे !

November 11, 2014 6:05 PM0 commentsViews:

MNS workers vandalise toll booths (54)11 नोव्हेंबर : पुणे शहरात येण्यासाठी किंवा पुण्यातून कुठेही बाहेर जाण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर टोल भरावा लागतो. काही रस्त्यांची कामे अर्धवट आहेत, तर काही रस्ते खराब आहेत तरीही टोल भरावा लागतो. थोडक्यात काय तर ‘रस्ते- सुविधा थोड्या आणि टोल फार’ अशी पुणे शहराची स्थिती आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे 2014 पर्यंत सुरू राहणार आहे. मात्र या टोलदरात दर 3 वर्षांनी 18 टक्के वाढ होते. जुन्या मुंबई-पुणे हायवेवरही टोल आहेतच. पुणे-नाशिक रस्त्याचं काम रखडलंय पण इथंही टोल भरावा लागतो. पुणे-नगर रस्त्यावरचा पेरणे टोलनाका तर आंदोलकांच्या पाठपुराव्यानंतर बंद झाला. पुणे-सोलापूर रस्त्याचं चौपदरीकरण पूर्ण झालंय. या 140 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाला 4 वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. या रस्त्यावर सर्विस लेन, ग्रेड सेपरेटर्स, पादचारी पूल, भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 2 हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. या प्रकल्पासाठी 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती, पण या मुदतीत केवळ निम्मं कामच पूर्ण झालंय. रस्ता रुंदीकरणाला जागा नाही, असं कारण ठेकेदाराकडून देण्यात येतंय. या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडतेय. तरीही या रस्त्यावर 5 ठिकाणी टोलनाके आहेत. पुणे-सातारा मार्गावर 2 टोलनाके आहेत. दरम्यान, नियमांनुसार 2 टोलनाक्यांमध्ये किमान 60 किलोमीटरचं अंतर ठेवावं, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close