राष्ट्रवादीचाही आमदारांना व्हिप,सभागृहात हजर राहण्याचे आदेश

November 11, 2014 8:44 PM0 commentsViews:

pawar_on_congress11 नोव्हेंबर :’सरकार अस्थिर होईल असा कोणताही निर्णय घेणार नाही’ अशी वेगळी भूमिका मांडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंब्याचा निर्णय आपल्या हाती राखून ठेवला. आता उद्याच्या निर्णयक दिवशी राष्ट्रवादीचे सर्व आमदार सभागृहात हजर राहणार आहे. हे आता स्पष्ट झालंय. राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांना व्हिप जारी केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुणाला मतदान करायचं ? पाठिंबा कुणाला द्यायचा ? याचा निर्णय ऐनेवेळी सांगण्यात येईल असा आदेश आमदारांना देण्यात आलाय.

भाजपने जर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर शिवसेनेनं विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली आहे. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा शेवटपर्यंत राहिल की नाही याबद्दल कालच आपली भूमिका मांडली. सरकार अस्थिर होईल असा कोणताही निर्णय घेणार नाही असं पवारांनी स्पष्ट केलं. पण विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहतील अशी भूमिका अगोदर पवारांनी जाहीर केली होती. पण आता उद्या भाजपच्या बाजूने मतदान करतील की नाही याचा निर्णय आमदारावर असणार आहे असं सांगून पवारांनी आणखी उत्सुकता ताणून धरली. आता उद्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार सभागृहात हजर राहणार आहे पण मतदान कुणाला करणार हे ऐनेवेळी सांगण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या राष्ट्रवादी काय भूमिका घेते हे महत्वाचं ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close