फडणवीस सरकारची आज अग्निपरीक्षा !

November 12, 2014 12:29 AM0 commentsViews:

cm_devendra_fadanvis4१२ नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस सरकारची बुधवारी पहिली परीक्षा आहे. पाठिंबा देण्याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट न केल्यामुळे फडणवीस सरकारची  खर्‍या अर्थाने अग्निपरीक्षा ठरणार आहे. त्यामुळेच भाजप सरकारची सरकारची धाकधूक आणखी वाढली आहे.

स्वबळावर मैदान जिंकल्यानंतरही भाजपला सत्तेची वाट मात्र खडतर ठरलीये. विधानसभेत सर्वाधिक 122 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. कुणाचाही पाठिंबा न घेता भाजपने मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करून शपथविधीही उरकून घेतला. एवढेच नाहीतर छोटेखानी मंत्रिमंडळही स्थापन करण्यात करण्यात आलं. पण आता भाजपची बहुमतासाठीची खरी परीक्षा उद्यावर आलीये. उद्या सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी अवघे काही तास राहिले असतानाही भाजप आणि शिवसेनेमधला घोळ अजून कायम आहे. सत्तेत जायचं की, विरोधात बसायचं याबाबत सेना नेतृत्वाचा अजूनही निर्णय जाहीर झालेला नाहीय.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी संध्याकाळी सेनेच्या आमदारांची बैठक घेतली. पण कोणताही निर्णय जाहीर केला नाही. बुधवारी सकाळी भूमिका जाहीर करणार असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. शिवसेनेनं पक्षाच्या सर्व आमदारांना व्हिप बजावलाय. मंगळवारी रात्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळालीय. शिवसेनेनं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती फडणवीस यांनी केल्याचं समजतंय.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आमदारांनी व्हिप जारी केला. सर्व आमदारांनी सभागृहात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. राष्ट्रवादीने अगोदरच बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला पण अंतिम निर्णय ठरावाच्या वेळी जाहीर करणार अशी भूमिका स्पष्ट केल्यामुळे घोळ निर्माण झालाय. आता भाजप सरकारला राष्ट्रवादी पाठिंबा देणार की, शिवसेना पाठिंबा देणार यावरच सरकारच भवितव्य ठरवणार हे निश्चित आहे.

काय होणार बुधवारी?

- सकाळी 10 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ
- 11 वा. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी मतदान
- दुपारी 2 च्या सुमारास विश्वासदर्शक ठराव
- 4 वा. राज्यपालांचं अभिभाषण

 मिशन 145

शक्यता 1 – राष्ट्रवादीचा पाठिंबा
भाजप (122) + राष्ट्रवादी (41) = 163

शक्यता 2: राष्ट्रवादी गैरहजर
भाजप (122) + इतर (8) + अपक्ष (7) = 137

शक्यता 3: शिवसेनेचा पाठिंबा
भाजप (122) + शिवसेना (63) = 185

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close